काल सायंकाळी बायकोबरोबर घराजवळच्याच एका मॉल मध्ये गेलो होतो. तिथे जेवणाचा आस्वाद घेताना शेजारच्या टेबलाकडून एक दोनेक वर्षाची (माझ्यामते) मुलगी (माझ्यामते) धावत आली आणि आमच्या टेबलाशेजारी उभी राहिली. दिसायला एकदमच गोड होती आणि अमेरिकन असूनही आमच्याकडे बघून अगदी हसत खिदळत होती. नाहीतर बहुतांश अमरू बाळे एकदम गोबरी गोबरी पण मख्ख असतात. ट्रेनच्या डब्यात अमरू बाळ असेल तर त्याच्या आई वडिलांखेरीज कुणालाही फारसे कळत नाही पण देसी किंवा चायनीज बाळ असेल तर ते शेजारच्या डब्यात पण कळते.
असो, तर सांगायचा मुद्दा हा की ही गुंड मुलगी आमच्या शेजारी येऊन उभी राहिली आणि आम्ही तिची सोबत एंजॉय करत होतो. एवढ्यात तिचा बाप (माझ्यामते) कुठूनसा आला आणि त्याने अमेरिकन शिष्टाचाराप्रमाणे त्या मुलीच्या वतीने 'एक्स्क्यूज अस' म्हटले. तोही हसतमुख होता त्यामुळे आम्हाला फारसे ओशाळल्यासारखे झाले नाही. इथे देशातल्याप्रमाणे लहान मूल दिसले आणि तुम्ही १ मिनीट थांबून सहज खेळलात असे करता येत नाही, म्हणजे सभ्यपणाचे समजत नाहीत. त्या मुलाचे आई-बाप तुमच्याकडे 'हा मायकेल जॅक्सन पंथातला तर नाही' अशा नजरेने बघतात. आता एवढे सगळे घडल्यावर ती मुलगी किती गोड आहे हे तिच्या बापाला सांगणे ओघाने आलेच. आणि यावेळी गाडी लिंगभेदावर अडकली - ती खरच मुलगीच आहे ना, की मुलगा (की अजून काही चा प्रश्न तूर्तास बाजूला ठेवू). माझ्या तोडक्या मोडक्या इंग्रजीला ताण देऊन 'तो' किंवा 'ती' यांचा उल्लेख टाळून वाक्य बनवायचा प्रयत्न केला पण छे! बर त्या बापाला विचारावे की ही मुलगी आहे की मुलगा, तरी जरा कसेनुसेच वाटते. शेवटी एक स्माइलसे मामला निपट दिया.
आता तो/ती गोड होता/होती सांगायला लिंग माहित असण्याची काय गरज होती. पण नाही, ते माहित असावे लागते. अबक आंबा खातो/खाते हे सांगायला अबक चे लिंग माहित असावे लागते. अबक ला शाळेत प्रवेश घेताना जात दाखवावी लागते तशातलाच प्रकार. अबक दूध पितो या वाक्यात अबक पुंलिगी असल्याचे तर कळते पण अबक कुत्रा, बोका की गणपती यांपैकी काय ते कळत नाही. म्हणजे भाषेला पुंलिंग स्त्रीलिंगी मध्ये भेद करण्याची गरज इतर गोष्टींहून जास्त वाटते. आहे की नाही आश्चर्य. भाषा भाषांमध्ये हा फरक थोड्याफार फरकाने जाणवतोच.
आता भाषा-भाषांच्या गमती बघा. मराठीमध्ये तो/ती पिझ्झा खातो/खाते, म्हणजे सर्वनाम आणि क्रियापदात भेदभाव. पण तेच नकारार्थी वाक्यामध्ये तो/ती व्यायाम करत नाही म्हणजे नकारार्थीसाठी जास्त समानता. हिंदीमध्ये 'वह चारा खाता/ती है और रबडी नहीं खाता/ती' म्हणजे सर्वनामात किंवा होकारार्थी नकारार्थी मध्ये फरक नाही पण क्रियापदात आहे. इंग्रजीत 'ही/शी ड्रिंक्स बीअर बट डझ नोट ड्रिंक वॉटर' म्हणजे सर्वनाम सोडून बाकी सगळे तसेच (टल्ली). फ्रेंच मध्ये म्हणे सर्वनाम, विशेषण, क्रियापद सगळेच बदलते.
कदाचित हे फरक त्या त्या समाजाचा स्त्री पुरुषांकडे बघण्याचा दृष्टीकोन दाखवतात. हजारात एक संदर्भ असा असतो की ज्यात स्त्री पुरुष फरक कळेल. जसे - अबक गरोदर आहे. त्यासाठी सरसकट सगळ्या क्रियापदांना वेगळे वागवणे थोडे अचंबाकारक आहे. अर्थात याचे श्रेय बऱ्याच वर्षांपूर्वी ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्या भाषा बनवल्या त्यांना जायला पाहिजे. असेही म्हणता येईल की जेव्हा भाषांचा उगम झाला तेव्हा स्त्री पुरुष यांच्या संबंधांशी निगडित क्रिया आणि अन्नशोध यांचाच प्रभाव असल्याने 'हजारात एक' च्या ऐवजी 'दोनात एक' असेल. पण विकसित समाजातही असा बदल दिसतो. जसे 'स:/सा कन्दमूलानि खादति' या फक्त सार्वनामिक बदल असणाऱ्या भाषामातेच्या पोटी 'तो/ती भाकरी खातो/खाते' एवढा मोठा फरक असणारी भाषा जन्मली. या एका फरकात त्या काळच्या सामाजिक परिस्थितीमधील बदलाचा बराच मोठा प्रभाव जाणवतो.
तर एकूण काय, उगीच अनोळखी माणसांच्या पोरांना 'गोड' वगैरे म्हणण्याच्या भानगडीत पडू नये हेच खरे.
Showing posts with label अमेरिका. Show all posts

Sunday, December 02, 2007
Saturday, May 12, 2007
अमेरिकेतले पर्यावरणरक्षण
"रोज रोज काय मजेशीर! बस झाले आता विनोदी लेखन. इथे एवढे गंभीर प्रश्न पडलेत दुनियेपुढे आणि तुम्ही काय लिहिताय तर विनोदी..." मी आरशातल्या मला समजावले. आणि शेजारचा दिवा विझवला. मागच्या महिन्यातल्या पृथ्वी-दिवशी मी ऊर्जा-बचतीचा संकल्प केला होता तो अजूनही मी उत्साहाने राबवत होतो. शेवटी स्वरूप पाहिल्याशिवाय विश्वरूप कसे दिसणार - दहावीत असताना विनोबा असे काहीसे म्हणाले होते. असो, तर सांगायचा मुद्दा हा की या वैश्विक प्रश्नामागे मी हात धुऊन लागलो आहे.
त्याच सुमारास असे वाचले की २०२१ पर्यंत उष्मा एवढा वाढेल की पूर आणि दुष्काळामुळे बांगलादेश आणि भारत आदि देशांवर गंभीर संकट ओढवणार आहे. त्याचे मुख्य कारण असणारे अमेरिकेत होणारे अमर्याद प्रदूषण. बापरे! मी जरा घरातच इथे तिथे पाहिले. दोन संगणक चालू, तीन चार बल्ब, दोन ट्यूबा, शीतकपाट आणि चार्जरला एक मोबाईल. डोळेच बाहेर आले माझे. विजेचे बिल सपाट म्हणजे भाड्यातच सामावलेले असल्याने पैशाची काही चिंता नव्हती आणि म्हणूनच ही उधळपट्टी चालू होती. मग ठरवले की आजपासून सुधारायचे.
जळणारे दिवे पाहून सहजच गझल आठवली - ’मालवून टाक दीप - चुप’ पुढच्या ओळीने चित्त विचलित व्हायच्या आधीच गुणगुणणे थांबवले आणि घरातले सगळे उगीच जळणारे दीप मालवून टाकले। जरा अंधार वाटायला लागला पण त्या अंधारात मला उद्याच्या उषःकालाची बीजे दिसत होती. बल्ब बघितले तर सगळे १०० वॅटचे. कुणीतरी घर सोडून जाताना दिले होते आणि फुकट म्हणून बिनदिक्कत जळत होते. "अमरू संस्कृतीची कृपा" असे म्हणून मी मनातल्या मनात दोन चार शिव्या देऊन घेतल्या. इथे घरात ट्यूबा नसतात, असली तर फक्त स्वयंपाकघरात. पांढरा प्रकाश काम करताना आणि पिवळा प्रकाश आराम करताना असा काहीतरी अजब फंडा. त्यामुळे नवीन नवीन असताना घरात नाही तर बार मधे बसल्यासारखे वाटायचे. तसे अमरू लोक घरांमधे पीतवर्ण प्रकाशात पीत बसण्याशिवाय फारसे काही वेगळे कुठे करतात.
बल्ब पण भिंतीवर न लावता उंच उंच खांबांवर लावतात. या बल्बांची बटणे देखील चमत्कारिक असतात. समजा उजवीकडे बटण फिरवल्यावर दिवा लागत असेल तर कुठचाही डोके न फिरलेला माणूस दिवा बंद करायला बटण डावीकडे फिरवेल की नाही, पण ते उजवीकडेच फिरवावे लागते. पंख्याचे तर त्याहून अजब. एक साखळी असते जी एकदा खेचली की पंखा ३ वर, दुसर्यांदा खेचली की २ वर, आणि असेच चौथ्यांदा खेचली की बंद. पंख्याचा वेग हा हळू, अतिहळू आणि महाहळू असा अनुक्रमे ३, २ आणि १ साठी असतो. अहो पण म्हणून बिघडतं कुठे, वातानुकूलन असतेच की. पण इथेच तर खरी गोम आहे. आमची इमारत थोडी जुनी आहे त्यामुळे वातानुकूलकातून सहा महिने गरम आणि सहा महिने थंड हवा येते. तापमान नियंत्रण नाही. त्यामुळे थंडी किंवा गरमी या दोन्हीने मरायचे नसेल तर वा.कु. चालू करायचा, पंखा चालू ठेवायचा, खिडकी किंचित उघडायची आणि खिडकीपासून ठराविक अंतरावर झोपायचे, बस! आहे की नाही सोपे. एकूण काय तर विजेचा चुराडा.
पण आता मात्र मी ठरवले की हे सगळे थांबवायचे. तडक कपडे बदलले आणि ट्युबा आणायला निघालो. ऊर्जा वाचणार आणि घराचे बारपण जाऊन घरपण येणार म्हणजे एका दगडात दोन पक्षी! मी स्वतःवरच खूश झालो. खाली गेल्यावर जाणवले की थंडी बरीच जास्त आहे. म्हणून सायकलचा विचार सोडला व बस पकडली. नैसर्गिक वायूचे का होईना थोडेसे प्रदूषण झालेच. दुकानात पोहोचल्यावर लक्षात आले की ट्यूबा लावायला आधी भिंतीवर खिळे ठोका आणि थोड्या तारेवरच्या कसरती (वायरींग) करणे गरजेचे आहे ज्यासाठी इमारत व्यवस्थापनाची परवानगी लागते. च्या***, मी भाषिक स्वातंत्र्याचा उपभोग घेत मोकळेपणाने राग काढला. आता मी मोर्चा ऊर्जा वाचवक बल्बांकडे वळवला. ५ डॉलरला १ !!! म्हणजे ६ बल्बांचे ३० आणि बेसिनच्या वरचे बल्ब धरून ५० डॉलर!!! माझ्या निर्धाराची धारच गेली. आता एकच घेऊ आणि बघू चालतोय का व्यवस्थित अशी काहीशी फुटकळ सबब बनवून एक घरी आणला. आणल्या आणल्या त्याच्या शुभ्र चांदण्याने घर न्हाऊ घालण्याचा मोह काही आवरला नाही आणि तडक सगळे दिवे मालवून एक दिवा काढून ठेवला व नवीन लावला. खटॅक - बटण दाबताच सर्पिलाकार बल्ब मधे जीव आला आणि त्याकडे बघण्याचा गाढवपणा करणार्या माझ्या डोळ्यासमोर तारे चमकले. मिटलेल्या डोळ्यांसमोर बराच वेळ त्या सर्पिलाकार उजेडाची निगेटिव दिसत होती. हळू हळू मी डोळे उघडले. काऽऽऽऽऽऽय? पिवळा प्रकाश? खोक्यावर तर लिहिलेय सॉफ्ट व्हाइट म्हणून. तो दिवा डिफेक्टिव असावा म्हणून परत केला आणि तो तसाच पीतप्रकाशी असतो कळल्यावर त्याचा नाद सोडला.
इथे ही दिवेलागणी होत असताना घरात जमलेल्या हजार प्लास्टिकच्या पिशव्यापण खुणावत होत्या। इतका कचरा फक्त आपल्या घरातून जमतो आणि अशी करोडो घरे असतील. आता हा कचरा कमी केलाच पाहिजे. उद्यापासून प्लास्टीक च्या पिशव्या दुकानातून सामान घेताना नाकारायच्या. पहिल्या मोहिमेत चांगलाच फटका बसल्यावर जरा सोपेच ध्येय घेतले होते. पण कळपाच्या विरुद्ध जाणे कठीणच असावे. कारण इथेही लगेचच दैवाचे फासे फिरले. दुकानात नेहमीप्रमाणे ८-१० पिशव्या मिळाल्या. मी अगदी उत्साहाने त्यातले सगळे सामान ३ पिशव्यांमधे बसवले. एक मोठी पिशवी घरून आणलीच होती. उत्साहात पैसे वगैरे देऊन घरी आलो आणि दुसर्या दिवशी लक्षात आले की पिशव्या वाचवायच्या गडबडीत एक सॉसची बाटली वाचवलेल्या पिशवीतच गचकली होती.
देव परीक्षा पाहतो ती अशी असावी पण अजूनही उत्साहाने काही बाही करणे चालू आहे. थोडे आव्हान, थोडी मजा आणि थोडे सत्कृत्य करताना बरे वाटते एवढेच.

Thursday, April 26, 2007
शरण्य सबमिशन
आता हा माउस कुठे ठेवायचा असे म्हणून थोड्या कागदांचे दुसरीकडे पुनर्वसन करण्याचा मी प्रयत्न केला पण एक कागद सरकताच दुसऱ्याने त्या जागेवर अतिक्रमण केले. त्या भानगडीत माझे लक्ष गुंतल्याचे पाहून एका पेन्सिलीने टेबलावरून उडी मारून आत्महत्येचाही प्रयत्न केला. पुस्तके वगैरे दांडगट मंडळी माझ्या झटापटीला दाद देत नव्हतीच. पण मधेच कळफलकाच्या कडा सर करून नसत्या कळा दाबून विरोध व्यक्त करत होती. त्यांचा एका हाताने कळफलकावरून कडेलोट केला तर त्या धक्क्याने कोपर्यातले पुस्तकांचे डोलारे डोला रे डोला रे करायला लागले. परिस्थिती हाताबाहेर जायला लागली आणि एफ् एम ने सुरात सूर मिसळला "इन्किलाब झिन्दाबाद".
माझे धाबे दणाणले होते. सामानांचा असामान्य लढा चालू होता माझ्याविरुद्ध, तोही असहकाराच्या शांततामय मार्गाने. लगेच मागल्याच आठवड्यात आणलेल्या "गांधी विरुद्ध गांधी" च्या सीडीला हुडकले, अपेक्षेप्रमाणे टेबलावरच सापडली. लगेच तिची रवानगी जमिनीवर केली. मी पण काही ऐकणार नव्हतो. तसा माझा भुता-प्रेतांवर विश्वास नव्हता, ना घडणार्या घटनांच्या अर्थपूर्णतेवर. पण आल्या परिस्थितीला तोंड देणेही भागच होते. अजूनही माउस शेपटीच्या बळावर टेबलावरून खाली लटकत होता. स्पीकर वगैरे बिनमहत्त्वाची मंडळी अजून खोक्यातच लपून होती. नव्या संगणक सेलेरॉन नसून सायमन आहे असा मला भास व्हायला लागला.
"भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे .. - कंग्रॅज्युलेशन्स! यू हॅव वन अ फ्री आय-पॉड नॅनो". आशाबाईंच्या निराशामय गाण्यामध्ये किरकिर्या आवाजातल्या उपटसुंभ जाहिरातीने माझी चांगली झोपमोड केली. मगाशी लटकणाऱ्या माउसला, त्याची शेपटी गालाखाली घेऊन मी जो आधार दिला होता त्याचे वळ गालावर उमटले होते. "गांधी वि. गांधी" याची सीडी आणि डबा यांनी टेबलाच्या पायथ्याशी विरुद्ध दिशेत झेप घेतली होती. डोळे किलकिले करून पाहिले तर समोर अर्धवट टाइप झालेला रिपोर्ट तसाच माझ्याकडे आ वासून पाहत होता. आणि भिंतीवरचे घड्याळ मला दोन्ही हात जोडून नमस्कार करत होते. काय? बारा? xxxx. अजून प्रेझेंटेशनची तयारी उरलिये.
ही आहे विद्यार्थी"दशा". कायम काहीतरी "ड्यू" असणे आणि ते जिवाचा आटापिटा करून वेळच्या वेळी सबमिट करणे ही "ड्यूटी". आणि सबमिशन म्हणजे शरण जाणे. या दोन शब्दांचे उगम असे असतील हे आता मला कळले. जुलूम जबरदस्तीने वेळेच्या मागे धावत राहण्याचे शिक्षण असे चालूच राहते. कधी कुणाचे बघून लिही, कधी कामे वाटून घे, त्यातूनही स्वतःचे वेगळेपण जप असे प्रकार करत करत विद्यार्थीदशा माणसाला घडवत जाते. आणि त्यातूनच घडतात किंवा बिघडतात आपल्या आजूबाजूची माणसे. अवास्तव अपेक्षांचे मोठे ओझे वागवण्याची आणि त्याविषयी तक्रारी करत राहण्याची एवढी सवय होते की त्या स्वतःहून निर्माण केल्या जातात. अशी माणसे स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य याच चक्रात भरडत राहतात. उदाहरणार्थ आमचे शिक्षक चेंग, हे टोपणनाव नाही चिनी नाव आहे, ज्यांच्या वर्गात उद्या आमचा ’निक्काल’ लागणार आहे.
------
"आमच्या वेळी किती अभ्यास होता माहितिये का? १५-१५ पौंडांचे एक एक पुस्तक होते", चिनी पुस्तकाबद्दल, चिनी ढंगात, जवळपास चिनीच वाटणार्या इंग्रजीत त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा ऐकवले. त्या पुस्तकांचा वापर करायला माझे हात शिवशिवत होते. काल रात्रीची झोप बदले की आग में सारखी डोळ्यांवर चाल करून येत होती. त्यातून ३० वर्षांपूर्वीच्या चिन्यांच्या चुकांची उजळणी, आजच्या खंद्या तरुण पिढीला पुन्हा एकदा झोपवत होती. "आजचे प्रेझेंटेशन ३०% चे आहे याची आठवण करून देऊन स्वतः शेवटच्या बाकावर विराजमान झाले".
१-२ मिनिटांच्या खटपटीनंतर प्रोजेक्टर पेटला व आमच्या भविष्यातला अंधकार कमी झाला. एकेका स्लाइड वरून घसरत धन्यवाद पर्यंत पोहोचलो आणि हुश्श केले. "कुणाला काही प्रश्न असतील तर..." (कुणाला म्हणजे चेंगसरांना, जशास तसे न्यायाने मुले तर नेहमीच सर्वज्ञ असतात.) असे म्हणून मी चेंडू पेंगणार्या चेंगच्या पुढ्यात ढकलला. पण ही चेंगपेंग खूपच दिक्भूलक ठरली. माझ्या सरपटी रबरी चेंडूच्या उत्तरात त्यांनी सीझनच्या चेंडूने एकावर एक उसळते प्रश्न टाकले. सगळेच नो बॉल पण पंचांच्या गोलंदाजीने सगळे अंदाज गोल करून टाकले.
आणि नहमीप्रमाणे दुखापतीने हैराण असे आम्ही पुढच्या सामन्याची तयारी करायला परतलो.

Saturday, April 21, 2007
अमेरिकेतील रोजचा प्रवास
आज कविता सोडून काहीतरी दुसरे लिहिण्याचा मूड आलाय. दुसरे काही म्हणजे गद्य. पुलं म्हणतात त्याप्रमाणे गद्य नाही ते पद्य आणि पद्य नाही ते गद्य हे अगदी खरेय. असो. आधी बराहा.कॊम चे आभार. त्यांनी जरा लिहायची सोय केलीये मराठीतून. असो.
विचार अगणित आहेत त्यामुळे सुरुवात करणे जरा कठीणच. म्युन्सिपाल्टीच्या मजुराला "जा, रस्त्यावरचे खड्डे बुजव" असे सांगितले, तर तो जसा बुचकळ्यात पडेल तशी काहीशी अवस्था आहे. रस्त्यावरून आठवले, ट्रॉलीत (शाळेची बस) बसून दररोज हजार धक्के खाताना देशातले रस्ते बरे असे वाटत राहते. आणि देशात याच्या उलट वाटते हे सांगणे न लगे. "यू हॅव प्लेंटी ऑफ कंप्लेंटी, इट्स युवर स्वभाव", एक इंग्रजाळलेला मित्रवर्य स्व भाव खात सांगतो. बसमधे बसून धक्के न लागून घेणे हे आपल्या बस मधे नसले तरी तो स्वभावाचा भाग कसा बनतो देव जाणे.
अमेरिका म्हटले की आपल्या डोळ्यासमोर तरळतात उंच उंच इमारती अन त्यांच्या काचांइतकेच गुळगुळीत रस्ते. रस्त्यात पाहाल तर प्रतिबिंब दिसेल. पण प्रत्यक्षात मात्र चालताना रस्ता न पाहाल तर प्रतिबिंब बघणेबल राहणार नाही. तसे म्हटले तर इथल्या म्युन्सिपालट्या कायम हा ना तो रस्ता दुरुस्त करतच असतात, त्यामुळे रस्त्यावरून जाताना सगळ्या लेन्स वाहनांसाठी मोकळ्या असणे कठीणच. अजस्र वाहने, जी ऑटोमॅटिक रस्ता बनवतात आणि त्यांच्या बाजूला एक पोलिसकाका हे दृश्य अगदी नेहमीचे आहे. इथल्या पोलिसकाकांना लोक जाम घाबरतात. पोपटी जॅकेट आणि त्यावर मोठ्या अक्षरात पोलिस असे लिहिलेले हे नमुने रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून चित्र विचित्र हातवारे करत असतात. आणि गाड्या शांतपणे इथून तिथून ये जा करत असतात. बसमधे बसून मी निरीक्षण करत असतो आणि शांतपणाने चाललेल्या या गर्दीत विचार करतो. कुठे हॉर्न नाही कुठे गोंगाट नाही कौतुकास्पदच.
तसा अमेरिकन माणसांचा समंजसपणा, एकमेकांविषयीचा आदर हे एक कोडेच आहे. इमारतीचे दार उघडणारा माणूस मागच्या व्यक्तीच्या अंगावर ते बंद होऊ नये म्हणून पकडून ठेवतो, रस्त्यावर अनोळखी माणूसही हाय करतो पण हाच अमेरिकन बसमधे पसरून बसला की दोन जागा खातो आणि हालतही नाही. त्यांची बससंस्कृती जरा वेगळी असावी. इअरफोनचे दोन बोंडुक कानात टाकून बसभर ऐकू येईल एवढ्या आवाजात गाणे लावले असताना त्याच्या मेंदूकडून अजून काही अपेक्षा करणेही तसे गैरच म्हणा. पण यांचे कर्ण कवचकुंडले घालूनच जन्मत असावेत, कारण जवळपास प्रत्येक अमरू आपल्याहून हळू आवाजात बोलतो अन ऐकलेले समजतो पण.
इथे सरकारी बशींचा/ट्रेन्सचा वापर तसा कमीच. विद्यार्थीवर्ग, गरीब-गुरीब अमरूजन आणि देशी-चायनीज कर्मचारीवर्ग यांचा प्रामुख्याने भरणा. बाकी सगळे कारसेवा करण्यातच पुण्याई मानणारे आणि रोज वाढणार्या कोंडीच्या आणि गॅसच्या भावाच्या नावाने खडे फोडणारे. आवळलेल्या टायमधून प्रदूषण आदि कल्पना यांच्या गळी उतरवणे कठीणच. कधी-कधी यांच्या पर्यावरण-जागृतीविषयक कल्पना पण अचाट असतात - आता परवाच पृथ्वी-दिवस साजरा झाला आमच्या शाळेत. त्यात एक उपक्रम राबवला तो असा - प्रत्येकाने एका पृथ्वी-दिवस कूपन चे प्रिंटाउट काढायचे आणि ते रिसायकल पेटीत टाकयचे. वाह! मान लिया इनको. यांना सांगितले की शक्यतो एका कारमधून अनेक जण एकत्र प्रवास करा तर हे ऑफिस मधून एकट्याने आल्यावर घरच्यांना घेऊन पुन्हा छोटी चक्कर मारून येतील.
असो. तर एकूण काय - घरोघरच्या चुली मातीच्या नसल्या तरी भाकरीचा प्रवास खडतरच.

Subscribe to:
Posts (Atom)